Monday, 6 August 2012

मायेची ऊब.....माहेर......

टम्म फुगलेली गरम भाकरी...त्यावर विरघळणारा लोण्याचा गोळा....भरल्या वांग्याची भाजी आणि लसणाची चटणी.....बरोबर गोड-घट्ट दही....
तव्यावरची गरमागरम पोळी थेट ताटात....तुपाची धार....दडपे पोहे.......बेसनाचे लाडू आणि पातळ पोह्यांचा चिवडा....
आई-बाबांचं कौतुक....बहिणीबरोबर मारलेल्या न संपणाऱ्या गप्पा....भावाबरोबरची दंगामस्ती....
उबदार पांघरूण घेऊन आरामात उशिरा उठणं....दुपारची झोप....
मायेची ऊब.....माहेर......